गुरुवार, २२ जुलै, २०१०

भंडारदरा धरण

भंडारदरा शेंडी म्हणजे माझ्या लहानपणापासून आता पर्यंतचे सर्वात आवडते निसर्गरम्य ठिकाण आहे असे म्हंटले तरी चालेल. आम्ही लहानपणी कुणीही पाहुणे आमच्या कडे आले की त्यांना तेथेच नेत असू. मग आई बरोबर डबा घेत असे भरल्या वांग्याची भाजी त्यावर दही , बाजरीची भाकरी, तव्याचे पिठले आणि कांदा हा हा हा आताही ती चव तोंडात रेंगाळत आहे....मग आम्ही भंडारदरा गार्डनमध्ये आधी भरपूर पाण्यात डुंबत असू आणि सडकून भूक लागली की आशा पक्वान्नाचा फडशा पाडत असू. खरच काय दिवस होते ते ......गार्डनमध्ये दोन मोठे फॉंल आहेत. त्यातला मोठा 'आम्रेला फॉंल' या नावाने प्रसिद्ध आहे.त्याच्या जवळ जायला मिळावे म्हणून तिथे ब्रिटीशकालीन सुंदर ब्रिज आहे. तिथून छत्रीच्या आकाराच्या ह्या भव्य फॉंलमधून जणू दुधच ओसंडत आहे असेच वाटते. हे धारण ब्रिटीश कालीन आहे आणि विशेष म्हणजे आजही ते आपल्याला त्या काळात नेते. त्या काळातील सरकारी अधिकार्यांच्या उतरण्यासाठी बांधलेला काच बंगला 'बॉबी'तील 'हम तुम एक कामरेमे' या गाण्याच्या शुटिंग मुळे 'बॉबी बंगला' म्हणून प्रसिद्ध आहे.धरणाच्या भिंतीवरून चालत असताना धरणाच्या विशालतेत आपण स्वतः हरवून जातो आणि त्या अथांगतेचे भाग बनून जातो. दूरवर असलेल्या डोंगरांकडे नजर भिडवतो आणि शोधू लागतो शून्याला कारण ते स्थब्ध जल आपल्याला थांबवलेल्या तुफानासारखे भासते, जणू ते सांगत आहे आपल्याला की तुम्ही मला आडवले म्हणून नाही तर ....... आणि त्याच्या या थांबण्याला इतकी स्थिरता कोणी दिली हे गूढच आपण त्या शून्यात शोधतो. मग आपल्याला दिसते डोंगराच्या मध्यावरची एक पोकळी. आहो हा शून्य नसून 'रतनगड डोंगरावर'असलेली नैसर्गिक खिडकी आहे. गार गार वर घेत आपण पुढे पुढे जातो आणि भिंतीच्या शेवटच्या टोकाला येतो तिथे आहे 'स्पील वे'.म्हणजे धरण भरले की येथूनच जास्तीचे पाणी ओसंडते. भले मोठे लोखंडी गेट आपले डोळे फिरवतात. ह्या भिंतीवरून ओसंडणारे पाणी अंगावर घेण्यातली मौज तुम्हीही एकदा आनुभावाच दर वर्षी साधारण पणे ऑगस्ट महिन्यात धरण भरतेच भरते.पावसाची श्रावण महिन्यातील हलकीशी भुरभूर नी धरणाच्या साठ्यातील शक्तिशाली लाट यांच्या संगतीत निसर्गाची मजा घ्यायला मी दरवर्षी नक्की जातेच आणि मग धरण्याच्या पाण्याबरोबर माझे मनही उचंबळत असते.

२ टिप्पण्या:

  1. Apratim varnan ahe..... agdi swataha tithun ferfatka marlyasarkha vatla... khup chan ! Dhanyawad !!

    उत्तर द्याहटवा
  2. kharach chaan lihila aahe tumhi. Mi 1973-74 sali tya bhagatun survey chya nimittana hindalo aahe.Akolyat barobarchya mitranchya shetavar dalbatti-gul,asa bet kelela athavatay mala.
    Chhan ! junya smrutinaa ujala milal tumchya lekhamule.
    NY-USA

    उत्तर द्याहटवा