रविवार, ६ मार्च, २०११

लग्न

लग्न, नवीन नात्यांची गुंफण. कोमल प्रेमाची फुंकर. अवती भोवती जग सारे, भांबावणारे भाव अंगण. लग्न, मनातली चलबिचल. हळुवार प्रीतीची चाहूल. आनंदाचे पर्व सोबत. नाविन्याचा धुंद गंध. लग्न, मिलनाचा मोहक रंग. बहरण्याचा तारुण्य वर्षाव. नात्यांचे बदलते गाव, अन आयुष्यातला सुंदर ठाव.

स्वप्नाली

स्वप्नातल्या स्वप्नाली तू आवरते घे स्वप्न हे, मनातल्या गेही माझ्या पाहुणे यायची वेळ झाली. निमुटपणे जा सानुली तू रागाऊ नकोस माझ्यावर, तुज कसे सांगू ग सकाळची वेळ झाली. आजवर मी होते तुझी तुझीच साथ होती प्रिये, पण तुझ्यात अशी रमण्याची वेळ सरून गेली. आता प्रत्यक्षात जगायचे आहे.जीवन फुलवायचे आहे. तुझ्यात पाहिलेले स्वप्न, प्रत्यक्ष अनुभवायचे आहे.

प्रेमात सारे माफ

आपल्या भावनांना बहार येतो पण त्या आवरायच्या असतात. दुरावलो जरी कुणापासून तरी आठवणीत त्या असतात. चुकले कोणी प्रेमात तरी चूक मनापासून नसते. भरकटलेल्या प्रेमाची रित पक्ष्याप्रमाणेच असते. वाट चुकले तरी शेवटी घरट्याकडेच ओढ असते.