लग्न,
नवीन नात्यांची गुंफण.
कोमल प्रेमाची फुंकर.
अवती भोवती जग सारे,
भांबावणारे भाव अंगण.
लग्न,
मनातली चलबिचल.
हळुवार प्रीतीची चाहूल.
आनंदाचे पर्व सोबत.
नाविन्याचा धुंद गंध.
लग्न,
मिलनाचा मोहक रंग.
बहरण्याचा तारुण्य वर्षाव.
नात्यांचे बदलते गाव,
अन आयुष्यातला सुंदर ठाव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा