स्वप्नातल्या स्वप्नाली तू आवरते घे स्वप्न हे,
मनातल्या गेही माझ्या पाहुणे यायची वेळ झाली.
निमुटपणे जा सानुली तू रागाऊ नकोस माझ्यावर,
तुज कसे सांगू ग सकाळची वेळ झाली.
आजवर मी होते तुझी तुझीच साथ होती प्रिये,
पण तुझ्यात अशी रमण्याची वेळ सरून गेली.
आता प्रत्यक्षात जगायचे आहे.जीवन फुलवायचे आहे.
तुझ्यात पाहिलेले स्वप्न, प्रत्यक्ष अनुभवायचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा