मी तुमची तुमच्यातलीच एक! घर, संसार हेच माझं विश्व. माझ्या मनाच्या शिंपल्यात दडलेले काही मोती तुमच्यासमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.
गुरुवार, ९ सप्टेंबर, २०१०
"माहेरची वाट माझ्या नजरेने"
मी दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही मी भंडारदरा परिसरात पावसाळा सफर करून आले त्याचे काही फोटो तुमच्यासाठी
हा वासाळी घाट "कळसुबाई" शिखराजवळ असलेला हा घाट म्हणजे अहमद नगर जिल्ह्याच्या ह्या सुंदर घाट माथ्याला दिलेली निसर्गाची सलामीच आहे, पावसाळ्यात तर ती आजून खुलते.
हे आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च सह्याद्रीतील शिखर 'कळसुबाई.' ढगांनी त्यालाही आपल्या पाशात घेतल आणि एव्हडा उंच डोंगर ही क्षणार्धात धुक्यात मिटून गेला.

हि आहे घाटघर ची दरी म्हणजेच कोकणकडा धुक्याच्या दुलइत सामावलेलं. आम्ही गेलो त्या दिवशी 21 ऑगस्ट ला इथे फारसा पाऊस नव्हता, पण ढगांच्या पुंजक्यांचा पाठशिवणीचा खेळ चालला होता. त्यात हि दरी मधेच दिसे तर क्षणात धुक्यात गडप होत असे. भूर भूर पाऊस सोबत वर नि धुक खूपच मजा येत होती
खाली आल्यावर धरणाचा जलाशय आहे. ढगात लपलेला सूर्य आणि वाळलेली जलाशयातील झाडे, यांच्या मध्ये चंदेरी रंगाचे पाणी असे विलोभनीय दृश्य पाहून मन मोहून गेले
.
धुक्यात घाटावर आम्ही फिरलो,जवळच झाडीत मला हे झाड दिसले
.
घाटघर ला जाताना भंडारदरा धरणाचा विस्तृत जलाशय लागतो तोच हा.
घाटघर घाट माथ्या बरोबरच आजूबाजूचा परिसरही नयनरम्य आहे.पिवळ्या सुंदर रानफुलांची मलमली शाल निसर्गात सगळीकडेच पाहायला मिळते.
हे आहेत आसपासचे सह्याद्रीचे विलोभनीय कडे. टोकदार निरनिराळ्या आकारांचे हे कडे सर्वत्र पसरलेत. प्रत्येक कडा आपल्याला त्याच्याकडे खुणावतो हे मात्र नक्की
बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०
पावसाळा तुमचा ,माझा, सगळ्यांचाच मनापासून आवडणारा ऋतू , आणि त्यात श्रावण म्हंटले कि दुधात साखरच.
सगळीकडे या वर्षी बेताचा पाऊस झालाय त्याने सगळेच सुखावले आहे, म्हणून ह्या वर्षी तर हा काही खासच वाटतो आहे हे नक्की.
अनेक कवींना मोहिनी घालणारा पावसाळ्यातील श्रावण मलाही भुरळ घालतो.श्रावणाची मजाच काही और असते नाही.
'श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाते चोही कडे.
क्षणात येई शिरशीर शिरवे,
क्षणात फिरुनी उन पडे.'
आसा हा श्रावण वातावरणात पसरतो आणि उल्हास निर्मिती आपोआपच होते.
मन, सृष्टी तरारून जाते नवचैतन्य लेऊन सणवारही लगबग करू लागतात. हिंदू संस्कृतीत ह्या महिन्याला खास महत्व आहे ते सणांमुळे.
श्रावण उन ,पाऊसधारा, थंडावा सगळे संगतीला घेतो आणि सर्व प्राणी,पक्षी, चराचराला सुखद आल्हाद देतो.
सोनेरी उन्ह, भुरु भुरू पाऊस, मंद सुखद गारवा ह्या मुळेच श्रावण सगळ्या ऋतूंचा राजा होतो हे मात्र नक्की.
'तेरी दो टाके कि नौकारीसे
मेरा लाखोका सावन जाये'
हे गाण म्हणजे भर श्रावणात विरह सहन करणाऱ्या प्रेमिकेचे सत्य कथन आहे.
प्रेमाचाही नवा रंग हा ऋतू दाखवतो. एका छत्रीत चालताना प्रेमी युगुलांचा श्रावण दोघांना प्रेमात चिंब भिजवतो.
आणि मग त्यांना' प्यार हुआ इकरार हुआ ' हे गाण आठवलं नाही तरच नवल.
म्हातार्या माणसांच्या तब्बेतीला थोडा वाईट पण सणांमुळे त्यानाही उभारी देणारा हा श्रावण, त्यांच्या ही आयुष्यात वेगळाच म्हणावा लागेल.
सन, व्रत वैकल्य यांमुळे त्यानाही आपल्या रोजच्या दिनचर्येत बदल करावा लागतो आणि मग त्याच कंटाळवाण्या दिनचर्येतून त्याची श्रावण महिनाच सुटका करतो.
लहान मुलांना हा आवडतो कारण तो आला कि परीक्षा आटोपून पटकन राखी, बैल पोळा,गोकुळाष्टमी आणि सर्वात आवडता गणपतीबाप्पा आशा सणाच्या सुट्ट्यांचा खजानाच श्रावण आपल्यासंगे आणतो. चाकर माण्यानाही रोजच्या धाक धाकीतून सुट्टी देणारा हा श्रावण नाही म्हंटले तरी आप्लासच वाटतो आप्तांच्या गाठी भेटी भजे पार्टी , आणि पावसाळी सहलीसाठी, तेही ह्या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतात.
खरच हा श्रावण आपल्या सगळ्यांच्या किती जिव्हाळ्याचा झालाय.आपण स्र्हवान महिन्यात त्याच्याच रंगात, त्याच्याच तालावर नाचतो असे म्हणायला काही हरकत नाही, हो ना ! आपल्या संपूर्ण वर्षाचा आत्मा असणारा हा महिना आणि त्यातील एक एक दिवस आपण सगळे आनंदाने साजरा करूयात आणि गाऊया ....
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीम धारा.................
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)