मनशिंपला
मी तुमची तुमच्यातलीच एक! घर, संसार हेच माझं विश्व. माझ्या मनाच्या शिंपल्यात दडलेले काही मोती तुमच्यासमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.
मंगळवार, ८ एप्रिल, २०२५
सिंहाचा छावा
आज छवा पाहिला आणि मराठी रक्त उसळून आलं.. विकी कौशल मराठी नसला तरी मराठी मातीतला आहे, आणि त्यामुळेच की काय भूमिकेला संपूर्णपणे न्याय देत त्याने छवा साकारला आहे असं वाटलं. बुऱ्हानपूरची लढाई दाखवताना वाळी घालून दौडत आलेल्या घोड्यावर राजे संभाजी यांची प्रथम झलक अंगावर शहारा आणते. त्यानंतरची लढाई ने आपल्या समोर मर्द मराठा कातळ शरीर उभे करून, सरदारांची व मावळ्यांची आपल्या स्वराज्यावर असलेली निष्ठा तंतोतंत उभारण्यात ही फिल्म अतिशय यशस्वी झाली आहे. लढाईनंतर बऱ्हाणपूरचे झालेले हाल अतिशय बारकाव्याने दाखवले आहेत. त्यातील एक दृश्य छोट्या बाळाला आईकडे देताना संभाच्या मनात मायेचा फुटलेला पाझर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो.आईविना वाढलेल्या शंभूराजांची विकल अवस्था त्या वेळी झळकते. या लढाईचा उद्देश खजिना गोळा करणे हा नसून छत्रपतींच्या जाण्यानंतर औरंगजेबला जरब बसविणे आहे हा संदेशही उत्तमरीत्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला गेला आहे. लढाईनंतर येसूबाई भेटल्यावर तिच्या पाणीदार डोळ्यांमध्ये पती संभाजी बद्दलचा विश्वास दाखवताना रश्मिका मंडला च्या नजरेतून साक्षात येसूबाई झळकली आहे.आबासाहेबांना अखेरच्या क्षणी भेटता न आल्याची खंत हेरून येसूबाईंनी कवड्यांची माळ जिरे टोप व मोजडी दाखवून शंभू राजेंना घडवून आणलेले छत्रपतींचे दर्शन मन पिळवटून टाकते. शंभू बाळा आता राज्याभिषेक कर!! हा दिलेला आबासाहेबांचा मुक आदेश
"शब्दा वाचून कळलेसारे शब्दांच्या पलीकडले"
या गाण्याप्रमाणे मनातले नेमके भाव
प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास ही फिल्म यशस्वी झाली आहे.
त्यानंतर सिंहासनावर बसलेले शंभू राजे सिंहासनाकडे चालत असताना आपल्या अंगावर शहारा आणतो. शंभूराजांनी त्यासाठी आपल्याच घरात लहानपणापासून सोसलेला त्रास. आईविना वाढलेलं पोर, धारावू आईच्या दुधावर निपजलेला छवा. हंबीर मामांचा शंभू छत्रपती होतो.राज्याभिषेका नंतर जेवतानाचा चित्रित केलेला प्रसंग, ज्यात येसूबाईंचे दोन्ही बंधू गणोजी व कान्होजी संभाजी राजेंना कोकण प्रांत मागतात त्यानंतर येसूबाईंनी छत्रपती राजे शिवाजी यांची आठवण करून देत "आबासाहेब म्हणायचे, की प्रत्येकाला असे स्वातंत्र्य दिले तर जो तो आपल्या मर्जीप्रमाणे राज्यकारभार करील ते नेहमी या गोष्टीच्या विरुद्ध होते." हे दिलेले उत्तर येसूबाईंच्या आदर्श राजकारणाची झलक दाखवतात. तर गणोजी कानोजी च्या डोक्यातील बंडाची तिथेच पडली हे समजते. सोयराबाईंचे राजारामाप्रती प्रेम त्यासाठी अकबराशी हात मिळवणी व फितूरीचे पत्र त्यानंतर सजा म्हणून अनाजी दत्तो, बाळाजी आवजी यांना हत्तीच्या पाया खाली दिले असे काही प्रसंग उत्तमरीत्या चित्रित केले आहेत. सोयराबाईचा अंत व त्यातच राजारामासाठी हंबीररावांच्या मुलीचा ताराबाईचा मागितलेला हात, हे सारे प्रसंग उत्तमरीत्या गोवले आहेत. आता चित्रपट संगमेश्वर च्या दृश्यांपर्यंत येऊन ठेपतो. तिथे संभाजी राजे यांच्यावर दगा होऊन त्यांना साखळ दंडाने बांधून औरंगजेब समोर उभे करण्यापर्यंत साकारलेला सिंहाचा छवा आपल्यासमोर रौद्ररूपात, साक्षात भोलेनाथाचा अंश म्हणून उभा राहतो. आपल्या हाताच्या मुठी आवळल्या जातात, पायातून रक्त सळसळत मेंदूपर्यंत जाते, डोळ्यातून अश्रूंची धारा वाहत असूनही, डोळे बंद न करता आपण ते दृश्य पाहत,रगा रगातून सळसळणाऱ्या रक्ताचा अनुभव घेतो. आपणही त्या क्षणी संगमेश्वरच्या त्या तटावर झालेल्या लढाईत अदृश्य स्वरूपात सामील होतो. समुद्रासारख्या मुघली फौजेवर तुटून पडलेला राजा आपल्या धमन्यातील हिंदुत्व चेतवतो आणि निपचीत पडलेला आपला धर्मभाव आता सळसळता हुंकार भरायला लागतो. समोर चाललेले दृश्य हा एक चित्रपट आहे हे आपल्याला क्षणभर विसरायला होते. राजे तुम्ही लढा.... आम्ही पण तुमच्या सोबत आहोत...लढा राजे लढा !!असे शब्द बाहेर पडतात. संभाजी राजेंना साखळ दंडाने बांधून नेताना साखळ दंडाचे वळ आपल्या मनावर रुतलेल्या ची असह्य वेदना जाणवायला लागते . त्यानंतर औरंग्या समोर आल्यावर काटेरी नजरेतून त्याच्यावर झेपावणारा छवा, धर्मरक्षक संभाजी राजांचा दृढनिश्चय प्रेक्षक अवाक होऊन पाहतो.
कवी कलश म्हणजेच संभाजी राजांचा 'छंदोगामात्य' यांची शंभूराजांवर केलेली कविता त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवते, तर औरंग्यावर शब्दरूपी तीर चालवते.
फौज तो तेरी सारी हैं, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा... अब भी सब पे भारी है।', म्हणत कवी कलश त्याला उत्तर देतो आणि आपल्याही अंगावर शहरा येतो.
राजांबरोबरची शेवटची काव्य जुगलबंदी व शंभूराजेंनी "कवी तूम नमक नही चंदन-तिलक हो!" म्हणत कवी कलश यांच्या मित्रत्वाचा केलेला सन्मान... तर मै तिलक नही नमक हू,जो शत्रु के घाव पर लगे.. .. असे नमक ही कवींनी शत्रूवर सोडलेले उपहासात्मक शब्दरूपी बाण आपल्या मनाला दिलासा देतात. त्यानंतर सगळे जे घडते ते खूपच वेदनादायक पण वास्तव आहे कदाचित जे दाखवले आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने भयंकर सत्य इतिहासात दडलेले असेल. पण पुढचे हे दृश्य बघायला मी मात्र थेटरमध्ये थांबूच शकले नाही. 11 मार्च असतो दिवस ज्या दिवशी अतोनात हाल सहन करून शिवरायांचा हा बाळ शरीराचे अतोनात हाल सहन करून भीमा इंद्रायणीच्या तीरावर शांत निजला...
कवी कलशांचे अखेरचे काव्य
यावन रावन की सभा संभू बंन्ध्यो बजरंग ।
लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग ।।
ज्यो रबि छबि लखतही नथीत होत बदरंग ।
त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग ।।
सौ शितल जाखडी,
ठाणे
ओळख
माझी ओळख
एकदा चिंगी सुट्टीत, गेली समर कॅम्प ला.
सरांनी सांगितले सगळ्यांना,ओळख सांगायला.
चिंगी चा नंबर आल्यावर, चिंगी चट्कन उठली.
सांगते माझी ओळख
ऐका हं... !! म्हणाली.....
माझे नाव आहे
चिंगी चेतन चांदवडकर.
मी इयत्ता पहिलीत शिकते.
मी आहे ठाणेकर....
माझ्या शाळेचे नाव आहे
बाल भवन,ठाणे.
आम्ही शिकतो छान छान तीथे मराठी गाणे.
मी सात वर्षाची आहे.
आहे किती मोठ्ठी!!
मला आवडतात कविता, गाणे, नाच आणि गोष्टी.
कवी
मनशिंपला
ठाणे
शुक्रवार, २१ मे, २०२१
"मी नाटकाची नाटक माझे"
मी अल्फा करंडक ( झीचे नाव तेंव्हा अल्फा होते) मध्ये भाग घेतला आणि नासिकच्या
कालिदास कला मंदिराच्या रंगमंच्यावर एकांकिका सदर केली. आयुष्यात आणखी काय हवे
माणसाला, जिथे बडे बडे कलाकार आपली कला सदर करतात त्या रंगमंचावर मी!!!! आमची
एकांकिका उत्तेजनार्थ आली. पण त्या नंतर मला राज्यानात्या स्पर्धेसाठी विचारणा
करण्यात आली पण वकिलीची परीक्षा जवळ आल्याने मी नकार दिला. तो नकार म्हणजे मी माझे
जणू नाटकासाठी दारच बंद केले.त्या नंतर आज तागायत मी वाट पाहत आहे रंगमंचाची.
माद्यान्तरीच्या काळात कॉलेज च्या शेवटच्या वर्षात मी "नायगावला" (सावित्रीबाई फुले
यांचे जन्मगाव) .सावित्री फुल्यांच्या जीवनावर पथनाट्य सदर केले होते.त्यात राज्य
नाट्य स्पर्धेचे विशेष सावित्रीबाई भूमिकेचे बक्षीस मी पटकावले.त्या वेळी मेधा
पाटकर ताई तेथे आल्या होत्या त्यांचाशी वयक्तिक ओळख माझी झाली.मी त्यांच्या बरोबर
आलेल्या नर्मदा खोरयातील आदिवासींबरोबर आदिवासी नृत्य केले.आणि त्यांची विशेष दाद
हि मिळवली होती. असाच एक अजून अनुभव सांगते ... मी लहान असताना माझे बाबा शाळेच्या
शिक्षकांचा ग्रुप घेऊन खूप नाटक बसवीत आसत ती नाटक अनेक खेडोपाडी गावो गावी होत.
आम्ही पण जात असू. एकाच प्यालाचा प्रयोग होता मी २ वर्षांची असेल मला आईचा पदर धरून
चालायची खूप सवय होती. आई नाटकात ताई होती. जी कुमारीअसते, आईने स्टेजवर प्रवेश
केला तिचा लाग्नावारुंच काही तरी संवाद होता पण मी आई बरोबर मंचावर गेले पदर धरून
आणि जो हशा पिकला..... मी चार वर्षाची असताना, “नटसम्राट” नाटक बाबांनी बसवले.
त्यात मला ठ्मीची भूमिका साकारायला मिळाली. ते नाटक तेंव्हा माझे तोंडपाठ
होते.कोणीही विसरले कि मी त्यांचे संवाद त्यांना बरोबर सांगत असे. विशेष म्हणजे ते
नाटक आम्ही पुण्याला बालगंधर्व ला घेऊन गेलो. तिथे माझे खूप कौतुक हि झाले.
बालगंधर्व रंगमंच आज आठवले तरी खूप शहारे येतात. तेंव्हा मला त्या रंगमंचाची भव्यता
आणि महानता समजण्या इतकी मी मोठी नव्हते,पण आज जेंव्हा केंव्हा तोमंच आठवतो तेंव्हा
माझे उर अभिमानाने भरून येते. मी नसेल आता त्यातले काहीही करत पण त्या छोट्या वयात
माझ्याकडून बरेच सुंदर आणि आजही मला अभिमान वाटणारे काम मी केले, “ हे हि नसे
थोडके" . नंतर शाळा शाळांमध्ये माझे सत्कार समारंभ झाले होते.तेंव्हा बक्षीसही
मिळाले. आठवणारे बक्षीस म्हणजे साने गुरुजींचे , “श्याम ची आई” हे पुस्तक. ते
पुस्तक, आई वरचा ग्रंथच आहे. आजही वाचले कि लहानपणी यायचे तसेच डोळ्यात पाणी येते.
मला नेहमी वाटते कि आपण जे करतो त्या पेक्षा जे केले ते अधिक आठवते. आणि त्या आठवणी
जर अशा असतील तर मग क्या बात.... !! मी माझ्या आयुष्यात आसे दिवस पुन्हा येवोत
इतकीच प्रार्थना करते.
मंगळवार, १० जुलै, २०१२
सह्यागिरीला साज रानफुलांचा!
दुर्गभ्रमंती, गिर्यारोहण, निसर्गसहली आणि पावसाळी पर्यटनासाठी चांगला परिसर अशी कळसुबाई रतनगड हरिश्चंद्रगड माळशेज घाट या भागाची आजवरची ओळख आहे, मात्र जैवविविधतेने नटलेल्या या परिसराची आणखी एक ओळख पुढे येतेय ती येथील रानफुलांच्या अनोख्या पुष्पोत्सवामुळे! मान्सूनच्या आगमनाची वर्दी देणारा काजव्यांचा अनोखा प्रकाशोत्सव... तो संपतो न संपतो, तोच सुरु होणारा जलोत्सव... आणि आता सह्यगिरीच्या कुशीत बहरलाय तो रानफुलांचा पुष्पोत्सव. अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या कळसुबाई - हरिश्चंद्रगडाच्या या परिसराला रंगीबेरंगी फुलांच्या अलंकारांनी निराळीच झळाळी आली आहे.
फुलाची ही दुनियाच अदभूत अशी आहे. किती किती फुले? त्यांच्या त-हाही तितक्याच. रंग, रूप, गंध, आकार, रचना.. प्रत्येकाचे आपले निराळे वैशिष्ट्ये. काही रात्री फुलतात, तर काही दिवसा. काही सुवासिक तर काही वास नसलेली... काही औषधी गुणधर्म असलेली तर काही चक्क कीटकपक्षी! पिवळीधमक सोनकी तर आठ - पंधरा दिवस रंगाची मुक्त उधळण करते, कारवी मात्र रुसून बसल्याप्रमाणे सात वर्षे मुक्यानेच काढते अन सप्तपदी भरली की फुलांनी फुलून सुगंधाने मोहरून जाते. कारवीची फुले निळ्या रंगाची असतात. ती फुलली की सारे रान निळे निळे दिसू लागते. कारवीच्या या रंग आविष्कारला सुरुवात झाली की स्थानिक आदिवासी ' नीळ आली,नीळ आली' असे म्हणू लागतात.
सर्वोच्च शिखर कळसुबाई, खड्या उंचीचा महाकाय हरिश्चंद्रगड, बुलंद, बेलाग अशा विशेषणांना साजेसे अलंग, मदन, कुलंग हे कुर्रेबाज दुर्गत्रिकुट. पाबर, भैरव, शिंदोळा, घनचक्कर, कात्राबाई यांना सामावून घेणारी दुर्गराज रतनगडाची बलाढ्य पर्वतरांग. अस्ताव्यस्त पसरलेले दुर्गम डोंगरकडे आभाळाला भिडणारे सुळके, उरात धडकी खोल द-या, जीवघेणे उतार, साम्रदची सांदण.... आणखीनही बरेच काही..... निसर्ग शिल्पाचे कोंदण लाभलेली ही ठिकाणे पाहिली की भटकंतीचे चीज होते.
हिमालयाच्या खालोखाल देशभरात सह्यपर्वताची ख्याती आहे. त्यात रानफुलांबाबत सह्यगिरी आणि त्यातही कळसुबाई हरिश्चंद्रगडाचा हा परिसर [कासच्या पठाराच्या बरोबरीने] जगभरातल्या १८ महत्त्वाच्या ठिकाणांपैकी ( हॉट स्पॉट) एक समजला जातो. पावसाळ्याच्या अखेरीस भाद्रपद महिन्यात येथील पर्वत पठारांवर, डोंगरमाथ्यावर, उतारावर, कुठे खडकात फुललेल्या रानफुलांच्या रूपाने इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांची उधळण सुरु असते. येथील रानसम्राज्ञीने हिरवा शालू परिधान केला आहे. जागोजागी अजूनही निर्झराचं मंजुळ गाणं ऐकू येत आहे. फुलांचा बहर रंगीबेरंगी फुलपाखरांना निमंत्रण देतो आहे. रुंजी घालणा-या मधमाश्या फुलांना बिलगताहेत.... निसर्गाने गंधर्व - किन्नरांची मैफल भरविल्यासारखे वाटते आहे. त्यात नटखट उनाड वा-यावर डोलणारी अगणित फुले जणू भोवतीने फेर धरून नाचत रानप-यांच्या नृत्यांच्या आविष्काराचा भास घडवत आहेत. या मयसभेतील फुलांचे नानाविशेष, रंग, गंध, निळाई, हिरवाई या नाट्याची भैरवी आता सुरू झाली आहे. हा रंगविलास पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. मान्सूनच्या आगमनाबरोबरच तशी पुष्पोत्सवाची सुरुवात होते.
फुलझाडाचे प्रामुख्याने गवतवर्गीय, झुडूप,वेली आणि झाडे असे चार प्रकारात वर्गीकरण करता येते. कारवीचा अपवाद वगळता येथे गवतफुलांची संख्या मोठी आहे. दाटीवाटीने उगवलेली वा-यावर डोलणारी गवतफुले पाहिली की, आपले मनही नकळत 'गवत फुला रे गुवत फुला...' म्हणू लागते. काही फुले सुंदर, मोहक, सौंदर्यवान नववधूसारखी ! काही एकदम चिमुकली नाजुकशी म्हणजे १.५ मिलीमीटरची तर काही अगदी टपोरी २५० मिलीमीटर आकाराची. वर्षभरात फुलणा-या फुलांत पांढ-या रंगाच्या फुलांचा भरणा सर्वाधिक असतो. त्याखालोखाल गुलाबी, निळा, पिवळा, लाल, हिरवा या रंगांचा क्रमांक लागतो.
नवरात्रोत्सवाचे आणि फुलोत्सवाचे अतूट नाते आहे.अगदी वर्षानुवर्षांचे. सह्याद्रीत सर्व ऋतुंमध्ये फुलणा-या रानफुलांची संख्या पाचशेच्या घरात आहे. परंतु याचा बहर पीक पॉईंटला असतो तो सप्टेंबर - ऑक्टोंबरमध्ये. सध्या अनेकविध फुले फुललेली असली तरीसगळ्यात जास्त भाव खातेय ती पिवळी सोनकी!
सोनकीच्या इटुकल्या-पिटुकल्या फुलांच्या फुललेल्या पुष्पमळ्यांनी पर्वतपठारे पीतवर्णी दिसताहेत. तिला सोबत आहे ती रानतेरडा, रान गांजा, श्वेतांबरा, फांगळा, आभाळी - नभाळी, धालगोधडी, सोनटिकली, लाजाळू, जांभळी, मंजिरी, गोपाळी, रानतूर, सोनसरी, पांढरी कोरांटी, उंदरी कुसुंबी... आणखी कितीतरी फुलांची! मुळातच हरिश्चंद्रगडाचा हा परिसर म्हणजे सृष्टीला पडलेले एक सुंदर स्वप्नच जणू! शेकडो प्रकारच्या वृक्ष-लतांची साथसोबत या भागाला लाभली आहे. युगानुयुगांची.
येथील नवलाई स्थळविशेष गूढरम्यता, नीरव शांतता, पावित्र्य आजवर अनेकांनी न्याहाळले आहे. विविधांगांनी. मात्र 'माउंटन ऑफ फ्लावर्स' ही या सह्यापर्वताची ओळख नव्यानेच होते आहे. सभोवतीच्या गिरीशिखारांप्रमाणेच ही इवलाली रानफुले निसर्ग प्रेमींना साद घालता
विल्सन डॅम (भंडारदरा)
सहय़ाद्रीच्या कुशीतील या पर्वतरांगांमधून सरासरी साडेचार हजार फूट उंचीच्या पर्वतराईच्या खोबणीत वसलेला, सुंदर जलाशय म्हणजेच विल्सन डॅम (भंडारदरा). ब्रिटिशांनी १९१० साली या धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली. १९२६ साली बांधून पूर्ण झालेल्या या धरणाची जागा निवडताना दाखविलेली रसिकता वाखाणण्याजोगी आहे. इथल्या पर्वतराजीतील खोऱ्यांमुळे या परिसराला प्रति काश्मीर असं म्हटलं जातं.
पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर दूरवर पसरलेल्या सहय़ाद्रीच्या रांगा म्हणजेच बालाघाट. राकट कातळाच्या िपगट करडय़ा रंगाची ही डोंगररांग.. ऋतुमानाप्रमाणेच तिचं सौंदर्यही बदलत जातं. कधी काळी थंड हवेची ठिकाणं म्हणून पर्यटक इथ भ्रमंती करायचे. आता पावसाळी पर्यटनाची टूमही जोरात आहे.
सहय़ाद्रीच्या कुशीतील या पर्वतरांगांमधून सरासरी साडेचार हजार फूट उंचीच्या पर्वतराईच्या खोबणीत वसलेला, सुंदर जलाशय म्हणजेच विल्सन डॅम (भंडारदरा). ब्रिटिशांनी १९१० साली या धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली. १९२६ साली बांधून पूर्ण झालेल्या या धरणाची जागा निवडताना दाखविलेली रसिकता वाखाणण्याजोगी आहे. इथल्या पर्वतराजीतील खोऱ्यांमुळे या परिसराला प्रति काश्मीर असं म्हटलं जातं. उन्हाळ्याच्या सुरुवातीला या डोंगररांगा इथल्या जंगलात वाढलेल्या करवंद, जांभळाच्या जाळ्यांमुळे सुरुवातीला पाचूच्या मण्यांची माळ, उन्हाळ्याच्या मध्यावर तांबूस पोवळ्यासारख्या तर पिकल्यानंतर नीलम रत्नांच्या माळा ल्यायल्यासारख्या दिसतात.
सरता ग्रीष्म आणि वर्षां ऋतूच्या आगमनाअगोदरच्या संधिऋतूत या परिसरातील सादडाची झाडे प्रकाशमान होतात. काजव्यांचे पुंजके या झाडांवर वास्तव्याला असतात. काजव्यांच्या गुणन पद्धतीने होणाऱ्या प्रजननामुळे काही दिवसांतच झाडांवर जणू अंतराळातील नक्षत्रांचे संमेलन भरल्याचा भास होतो. खरं तर लौकरच येणाऱ्या कृष्ण जलदाच्या आगमनाची चाहूलच हे काजवे देत असतात. पावसाला सुरुवात होताच त्यांचं अस्तित्व लुप्त होतं. वर्षां ऋतूला सुरुवात झाली की, इथल्या करडय़ा कातळाचा रंगही बदलू लागतो. संबंध डोंगरावर हिरवाईची शाल पसरायला लागते. जसजसं पावसाचं प्रमाण वाढतं. तसतसं या पर्वतरांगांचं सौंदर्य खुलायला लागतं. डोंगरापलीकडून येणारे कृष्णमेघही या उत्तुंग शिखरांवर विसावतात. पर्वताच्या उतरंडीवर रेंगाळतात. गडद निळे-गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू, चपल चरण, अनिल गण निघाले या बा. भ. बोरकरांच्या काव्यपंक्ती स्मरतात. रेंगाळणाऱ्या मेघांमध्ये शिखरे, डोंगरवाटा लुप्त होतात. मेघराजाची दुलई बाजूला होताच डोंगरांच्या घळईतून कोसळणारे शुभ्र फेसाळ धबधबे नजरेस पडतात.
अहमदनगर जिल्हय़ातील भंडारदरा हे धरण नगरपासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक-पुणे-ठाणे जिल्हय़ातील पर्यटकांना वीकएंडला एकदिवसीय पर्यटनासाठी हे उत्तम ठिकाण.
भंडारदऱ्याच्या परिक्रमेला धरणाच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने सुरुवात करता येते. भंडारदरा (शेंडी), पांजरी, साम्रद, घाटघर, रतनवाडी, मुतखेल ही निर्सगरम्य पर्वतराजीतील दुर्गम गावे अगदी अलीकडच्या दशकात या भागात डांबरी रस्ते झाल्याने पर्यटकांचे पाय इकडे वळू लागले. नागमोडी वळणांच्या घाटदार रस्त्याने जसजसा या भागातला प्रवास सुरू होतो, तसतसा निसर्ग आपल्याला त्याच्या कुशीत सामावून घेऊ लागतो. जलाशयाच्या बाजूने वळणे घेत घेत प्रवास करताना समोरच्या डोंगरकडय़ांवरून घरंगळणारे मेघ, संततधार पाऊस, मेघांच्या दाट दुलईत अदृश्य होणारा रस्ता पार करताना आपसूकच ही वाट दूर जाते, स्वप्नांमधील गावा.. अशा ओळी ओठांवर तरळतात.
रतनगड डोंगरमाथ्यावरील एका गुहेतील प्रवरा नदीचा उगम आहे. याच नदीवर खाली भंडारदरा धरण बांधले आहे.
धरणांपासून साधारण २० किलोमीटर आत गेल्यानंतर पांजरी नावाचे छोटेखानी गाव इथून कळसूबाई शिखराच्या डोंगराचे दर्शन घडते. महाराष्ट्राचा एव्हरेस्ट मानल्या जाणाऱ्या कळसूबाई शिखराची चढाई येथून किंवा पलीकडच्या बारी गावातून करता येते. मांजरीहून पुढे घाटघरकडे जाता येते. पांजरी, घाटघर ही गावे महाराष्ट्रातील चेरापुंजी मानली जातात. एकदा पाऊस सुरू झाला की चार ते सहा दिवस अविश्रांत कोसळणं ठरलेलंच. घाटघरच्या कोकणकडय़ांवर उभे राहून खाली डोकावले की खोल दरीतला उदंचन विद्युत प्रकल्प नजरेत भरतो. एका बाजूला छातीत धडकी भरविणारा कोकणकडा, वेगाने रोरावणाऱ्या वाऱ्यांचा मंजुळ नाद पर्यटकांना भुरळ पाडतो. कोकणकडय़ाच्या बाजूलाच असलेल्या आश्रमशाळेच्या िभतीही हिरवळीने रंगविल्यासारख्या दिसतात. घाटघरच्या घाटणदेवी मंदिर परिसरातून दिसणारा सूर्यास्तही अत्यंत रमणीय असतो.
घाटघरकडून साम्रदमाग्रे रतनवाडीकडे जाताना साधारण १ किलोमीटर आडवाटेला सांदण लागते. या सांदणीची रुंदी साधारण ५० फूट असून रतनगड डोंगरातून येणारा ओढा या सांदणीतून वाहतो. या सांदणीतील मोठमोठय़ा शिळा साहसी पर्यटकांना साद घालत असतात. अर्थात पावसाळ्यात या सांदणीत उतरणं धोक्याचंच आहे. उन्हाळ्यात या सांदणीतून भ्रमंती करण्यातली मजाच वेगळी.. या सांदणीची लांबी सुमारे पाऊण ते एक किलोमीटर असून, दोन कडय़ांमधील ही उतरंड थेट ठाणे जिल्हय़ातील शहापूर तालुक्यात उघडते.
साम्रद ते रतनवाडीच्या प्रवासात डोंगरमाथ्यावरून कोसळणारे अनेक धबधबे पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. रतनवाडीच्या अलीकडेच एक धबधबा दूरवरून दिसतो. डोंगराच्या माथ्यावर दिसणारा हा धबधबा एका खडकाच्या दोन्ही बाजूने कोसळत पुन्हा एकत्र होतो. जणू निसर्गाने त्याच्या शोरूममध्ये लावलेलं ते एक नेकलेस असतं, धरणनिर्मितीच्या निमित्ताने ब्रिटिश अधिकाऱ्याचा येथे बराच वावर राहिल्याने इथल्या बऱ्याच ठिकाणांना इंग्रजी नावे दिल्याचे दिसून येते. या भागात दिसणाऱ्या अनेक धबधब्यांपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतो. तर काही धबधबे अगदी रस्त्याच्या कडेलाच असतात. त्यामुळे तिथे पर्यटकांचे पाय नक्कीच थबकतात.
बालाघाट डोंगररांगांत कोकणकडय़ांच्या बाजूला रतनगड हा देखणा दुर्ग आहे. गडसर करताना ट्रेकिंगचाही आनंद मिळतो. मात्र पावसाळ्यात चढणीच्या सर्व वाटा अत्यंत निसरडय़ा होतात. दोन तासांच्या चढाईनंतर शेवटच्या कडय़ावरच्या शिडीचा आधार घेत गडावर पोहोचता येते. रतनगड डोंगरमाथ्यावरील एका गुहेतील प्रवरा नदीचा उगम आहे. याच नदीवर खालीभंडारदरा धरण बांधले आहे.
भंडारदरा धरण भरलं की अतिरिक्त पाण्याचा विसर्ग धरणाच्या िभतीलगतच्या अर्धगोलाकार खडकावरून सोडला जातो. फेसाळणाऱ्या या धवलधारा छत्रीसारखा आकार धारण करत वाहायला लागतात. म्हणूनच त्याचे नाव अंब्रेला फॉल.
रतनगड डोंगरच्या पायथ्याशी एक जुनाट हेमांडपंथी शिवालय आहे. भंडारदऱ्याच्या जलाशयाच्या शेपटाकडचा हा भाग येथे धरण पूर्ण भरल्यानंतर मंदिराचा गाभारा पूर्ण पाण्यात असतो. भंडारदरा धरणाच्या िभतीपासून इथपर्यंतच अंतर ११ मलांचं धरण पूर्ण भरलं की होडीतूनही येथे येता येते. रतनगडच्या अमृतेश्वराचे (रत्नेश्वर) हे हेमांडपंथी मंदिर पांडवांनी बांधल्याची वदंता आहे. मंदिराच्या आतील काम आणि आजूबाजूची कोरीव शिल्पे पाहण्यासारखी आहेत. छतालाही कोरीव शिल्पांची सजावट आहे. मंदिरापासून अवघ्या ५० मीटर अलीकडे दगडी बांधकामांची देखणी पुष्करणी आहे. विष्णुपुष्करणी नावाच्या या पुष्करणीत उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या आहेत. पुष्करणीच्या आतल्या बाजूच्या िभतीतील कोनाडय़ावजा गाभाऱ्यात विष्णू नरसिंह, गणपती आदी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. पुष्करणीच्याच एका बाजूला असलेल्या झाडांना विळखा घालून काही वेली वाढल्या आहेत, त्या वेलींच्या फांद्या एकमेकांशी बिलगून नसíगक झुले तयार झाली आहेत. लहानांपासून मोठय़ांपर्यंत कोणालाही या झुल्यांवर बसून झुलण्याचा मोह आवरता येत नाही.
रतनवाडी ते मुतखेलमाग्रे पुन्हा धरणाच्या िभतीपाशी पोहोचता येते. या ठिकाणी आपली धरण परिक्रमा पूर्ण होते. या सर्व प्रवासात मुतखेलजवळच्या डोंगरमाथ्यावरून पडणारे धबधबे पायथ्याशी न पोहोचताच वाऱ्यामुळे हवेतच विरतानाचे दृश्य पर्यटकांना रोखून तर धरतातच आणि अंगावर येणारे तुषार मन रोमांचित करतात. या नागमोडी वळणांच्या प्रवासात काही ठिकाणी एकमेकांना बिलगून उभी असलेली कौलारू घरं इथल्या आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवितात. डोंगरउतरणीवर भात आवणीसाठी केलेल्या अर्धगोल, चौकोनी खाचरांमध्ये साठलेल्या पाण्यात निसर्ग जणू आपलं प्रतििबबच न्याहाळत असल्याचा भास होतो. अनेक शेतांतून भातशेतीसाठी घोटाभर पाण्यात मशागत चाललेली दिसते. तर कोठे इरलं अंगावर घेऊन बायाबापडय़ा भातआवणी करीत असतात. अनेक ठिकाणी वीतभर वाढलेली भाताची पिकं जमिनीवर अंथरलेल्या हिरव्याकंच मखमली गालिच्यासारखी दिसतात, वाऱ्याच्या झुळकावर लवलवणारे हे गालिचे पाहताना मनपाखरूही आपल्या नकळत विहरायला लागते..
भंडारदरा धरणाच्या अलीकडे १० कि.मी. अंतरावर रंधा फॉल या मोठय़ा धबधब्याचे दर्शन घडायचे, मात्र आता कोंदणी विद्युत प्रकल्पासाठी पाणी अडविल्याने हा धबधबा लुप्त झाला आहे. अतिवृष्टीनंतर अथवा धरणातील अतिरिक्त पाण्याच्या विसर्गानंतर महाराष्ट्राचा हा गिरसप्पा आपलं अक्राळविक्राळ रूप घेऊन प्रकटतो. हा धबधबा पाहायला मिळणं म्हणजे या भागातील पर्यटनातला अलभ्य लाभच. भंडारदरा धरण भरलं की अतिरिक्त पाण्याचा विसर्ग धरणाच्या िभतीलगतच्या अर्धगोलाकार खडकावरून सोडला जातो. फेसाळणाऱ्या या धवलधारा छत्रीसारखा आकार धारण करत वाहायला लागतात. म्हणूनच त्याचे नाव अंब्रेला फॉल या धबधब्याजवळ एक छोटेखानी पूल आहे. पर्यटकांना या पुलावर जाऊन तुषार स्नान घेता येते. इथंही इंग्रजांच्या रसिक कल्पकतेला दाद द्यावीशी वाटते. अंब्रेला फॉल पाहण्यासाठी धरण भरण्याची वाट पाहावी लागते. दरवर्षी साधारण १५ ऑगस्टनंतर अंब्रेला फॉल काही महिने पाहता येतो.
रंधा फॉल, अंब्रेला फॉल, कळसूबाई शिखर दर्शन, घाटघर उदंचन विद्युत प्रकल्प रतनवाडी, अमृतेश्वर मंदिर अशीएकदिवसीय भंडारदरा परिक्रमा करता येते.
डोंगर उतारावर मोठय़ा प्रमाणावर उगविणारी सोनकीची फुलं जणू डोंगराने ल्यालेल्या हिरव्याकंच शालूला सोनेरी पिवळी किनार लावतात.
भंडारदरा परिसरात निवांत भटकंती करायची म्हटले की, पाच-सहा दिवसांचा अवधी लागतो. पर्वतरांगेतील अलंग, कुलंग, मदनगडसह हरिश्चंद्रगड, विश्रामगड या गडकोटांबरोबरच अनेक वैशिष्टय़पूर्ण गावंही या पर्वताच्या कुशीत वसलेली आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर फोकसंडी हे गाव चारही बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या या गावात सूर्योदय इतर ठिकाणांपेक्षा तीन-चार तास उशिरा होतो आणि सूर्यास्त तीन-चार तास लवकर होतो. थोडक्यात इथला दिवस अवघ्या सहा-आठ तासांचा असतो. अकोले तालुक्यातून कोतुळ, पळसुंदे (भरोबा)माग्रे अबीतिखडीतून एकूण २५ किलोमीटर प्रवासानंतर फोकसंडी गावात पोहोचता येते. फोकसंडीतून थेट माळशेज घाटात पोहोचण्यासाठीही आता रस्ता झाला आहे.
जालना शहर लुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावर विश्रांती घेतली तो विश्रामगड, अकोले, समशेरपूर, खिरविरे फाटामाग्रे विश्रामगडावर जाता येते. तीरपाडे पाचपट्टा पठारावरील पवन ऊर्जा पकल्प पाहण्यासारखा आहे. डोंगरपठावरील ८०ते ८५ पंखे भिरभिरतानाचे दृश्य विलोभनीय असते. या व्यतिरिक्त राजूर शिरपुंजीमाग्रे कुमशेतसारख्या दुर्गम आदिवासी भागाला भेट देणे आता सहज शक्य आहे.
कळसूबाई, कुलंगगड, रतनगड, आजोबाचा डोंगर या सर्व शिखरांतील शेवटचे शिखर म्हणजे हरिश्चंद्रगड या गडाने नुकतीच ३५० वष्रे पूर्ण केली. अत्यंत अवघड चढणीचे हे शिखर ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्य़ातून या गडाकडे जाता येते. नगर जिल्ह्य़ातील कोतुळ, शिरपुंजी, पाचनईमाग्रे हरिश्चंद्रगडाकडे जाता येते. या गडाचे पौराणिक महत्त्वही मोठे आहे. हरिश्चंद्रगडालगतच तारामती, रोहिदास ही शिखरे पाहायला मिळतात. साहसी गिरिभ्रमणाबरोबरच वन्यजीव दर्शनही अनुभवता येते. निबिड जंगल, उंच डोंगर, खोल दऱ्या, मुळा नदीचे पात्र अशी वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक स्थितीत पर्यटनाची मजाच न्यारी.
उंबर, जांभूळ, कारवी, पांगारा, मोहाची झाडे अशा वृक्षवल्लरी तर कोल्हा, साळुंदी, बिबटय़ा, रानडुक्कर, विविध पकारचे साप, सरडे असे वनचर आणि सातभाई, भारद्वाज, बुलबुल, कोकिळा, खंडय़ा, वेडा राघू आदी पक्षीही पर्यटकांच्या नजरेस पडतात.
हिवाळ्यातही या परिसराचे रुपडं अवर्णनीय असतं. अनेक प्रकारच्या रानफुलांनी इथले डोंगर पायथे सजतात. नवरातीदरम्यान ही फुले जणू रंगोत्सव साजरा करतात. डोंगर उतारावर मोठय़ा प्रमाणावर उगविणारी सोनकीची फुलं जणू डोंगराने ल्यालेल्या हिरव्याकंच शालूला सोनेरी पिवळी किनार लावतात. या व्यतिरिक्त इतरही फुलांमुळे सर्व खोरे हिमाचल प्रदेशातल्या फ्लॉवर्स व्हॅलीचे प्रतििबब दर्शवितात.
सहय़पर्वताच्या भंडारदरा परिसरातील मुक्कामासाठी आता निवासी व्यवस्थाही चांगल्या आहेत. खासगी लॉजपासून ते महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या विश्रामगृहापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शासकीय विश्रामगृहाचे आरक्षण एक आठवडाभर अगोदर इंटरनेटच्या माध्यमातूनही करता येते. उन्हाळ्यात गिरिभ्रमण, उन्हाळा-पावसाळ्याच्या संधिऋतूत काजवा महोत्सव, पावसाळी पर्यटन आणि हिवाळ्यात पुष्पोत्सव असे वर्षभर पर्यटन करण्यासारखा हा परिसर. कधी काळी दुर्गम असलेल्या या परिसरातील जवळपास सर्वच गावे आता डांबरी रस्त्याने जोडली असल्याने पर्यटकांना इथल्या अनवट वाटा सरावाच्या व्हायला लागल्या आहेत. घाटदार, नागमोडी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली वनराई, हिरडा, तेरडा, करवंद, जांभूळ इतर आयुर्वेदिक वनस्पतीबरोबरच काही प्रमाणातील तेंदूपत्ताच्या वनराईने हा परिसर नटला आहे. या वनराईच्या कमानीतून प्रवास करताना निबिड अरण्य भ्रमंतीचा आनंद मिळतो. मात्र इतर पर्यटनस्थळी बाजारपेठांमुळे आलेला बकालपणा इथे नाही. स्वच्छ पर्यटनामुळे इथे अनट्च्ड नेचर इथं अनुभवता येत. अर्थात इथलं पर्यावरण, स्वच्छता या बाबी जपणं पर्यटकांच्याच हाती आहे.
रविवार, ६ मार्च, २०११
लग्न
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
