शुक्रवार, २१ मे, २०२१

"मी नाटकाची नाटक माझे"

मी अल्फा करंडक ( झीचे नाव तेंव्हा अल्फा होते) मध्ये भाग घेतला आणि नासिकच्या कालिदास कला मंदिराच्या रंगमंच्यावर एकांकिका सदर केली. आयुष्यात आणखी काय हवे माणसाला, जिथे बडे बडे कलाकार आपली कला सदर करतात त्या रंगमंचावर मी!!!! आमची एकांकिका उत्तेजनार्थ आली. पण त्या नंतर मला राज्यानात्या स्पर्धेसाठी विचारणा करण्यात आली पण वकिलीची परीक्षा जवळ आल्याने मी नकार दिला. तो नकार म्हणजे मी माझे जणू नाटकासाठी दारच बंद केले.त्या नंतर आज तागायत मी वाट पाहत आहे रंगमंचाची. माद्यान्तरीच्या काळात कॉलेज च्या शेवटच्या वर्षात मी "नायगावला" (सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव) .सावित्री फुल्यांच्या जीवनावर पथनाट्य सदर केले होते.त्यात राज्य नाट्य स्पर्धेचे विशेष सावित्रीबाई भूमिकेचे बक्षीस मी पटकावले.त्या वेळी मेधा पाटकर ताई तेथे आल्या होत्या त्यांचाशी वयक्तिक ओळख माझी झाली.मी त्यांच्या बरोबर आलेल्या नर्मदा खोरयातील आदिवासींबरोबर आदिवासी नृत्य केले.आणि त्यांची विशेष दाद हि मिळवली होती. असाच एक अजून अनुभव सांगते ... मी लहान असताना माझे बाबा शाळेच्या शिक्षकांचा ग्रुप घेऊन खूप नाटक बसवीत आसत ती नाटक अनेक खेडोपाडी गावो गावी होत. आम्ही पण जात असू. एकाच प्यालाचा प्रयोग होता मी २ वर्षांची असेल मला आईचा पदर धरून चालायची खूप सवय होती. आई नाटकात ताई होती. जी कुमारीअसते, आईने स्टेजवर प्रवेश केला तिचा लाग्नावारुंच काही तरी संवाद होता पण मी आई बरोबर मंचावर गेले पदर धरून आणि जो हशा पिकला..... मी चार वर्षाची असताना, “नटसम्राट” नाटक बाबांनी बसवले. त्यात मला ठ्मीची भूमिका साकारायला मिळाली. ते नाटक तेंव्हा माझे तोंडपाठ होते.कोणीही विसरले कि मी त्यांचे संवाद त्यांना बरोबर सांगत असे. विशेष म्हणजे ते नाटक आम्ही पुण्याला बालगंधर्व ला घेऊन गेलो. तिथे माझे खूप कौतुक हि झाले. बालगंधर्व रंगमंच आज आठवले तरी खूप शहारे येतात. तेंव्हा मला त्या रंगमंचाची भव्यता आणि महानता समजण्या इतकी मी मोठी नव्हते,पण आज जेंव्हा केंव्हा तोमंच आठवतो तेंव्हा माझे उर अभिमानाने भरून येते. मी नसेल आता त्यातले काहीही करत पण त्या छोट्या वयात माझ्याकडून बरेच सुंदर आणि आजही मला अभिमान वाटणारे काम मी केले, “ हे हि नसे थोडके" . नंतर शाळा शाळांमध्ये माझे सत्कार समारंभ झाले होते.तेंव्हा बक्षीसही मिळाले. आठवणारे बक्षीस म्हणजे साने गुरुजींचे , “श्याम ची आई” हे पुस्तक. ते पुस्तक, आई वरचा ग्रंथच आहे. आजही वाचले कि लहानपणी यायचे तसेच डोळ्यात पाणी येते. मला नेहमी वाटते कि आपण जे करतो त्या पेक्षा जे केले ते अधिक आठवते. आणि त्या आठवणी जर अशा असतील तर मग क्या बात.... !! मी माझ्या आयुष्यात आसे दिवस पुन्हा येवोत इतकीच प्रार्थना करते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा