मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

ओळख

माझी ओळख एकदा चिंगी सुट्टीत, गेली समर कॅम्प ला. सरांनी सांगितले सगळ्यांना,ओळख सांगायला. चिंगी चा नंबर आल्यावर, चिंगी चट्कन उठली. सांगते माझी ओळख ऐका हं... !! म्हणाली..... माझे नाव आहे चिंगी चेतन चांदवडकर. मी इयत्ता पहिलीत शिकते. मी आहे ठाणेकर.... माझ्या शाळेचे नाव आहे बाल भवन,ठाणे. आम्ही शिकतो छान छान तीथे मराठी गाणे. मी सात वर्षाची आहे. आहे किती मोठ्ठी!! मला आवडतात कविता, गाणे, नाच आणि गोष्टी. कवी मनशिंपला ठाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा