गुरुवार, ९ सप्टेंबर, २०१०

"माहेरची वाट माझ्या नजरेने"

मी दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही मी भंडारदरा परिसरात पावसाळा सफर करून आले त्याचे काही फोटो तुमच्यासाठी हा वासाळी घाट "कळसुबाई" शिखराजवळ असलेला हा घाट म्हणजे अहमद नगर जिल्ह्याच्या ह्या सुंदर घाट माथ्याला दिलेली निसर्गाची सलामीच आहे, पावसाळ्यात तर ती आजून खुलते. हे आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च सह्याद्रीतील शिखर 'कळसुबाई.' ढगांनी त्यालाही आपल्या पाशात घेतल आणि एव्हडा उंच डोंगर ही क्षणार्धात धुक्यात मिटून गेला. हि आहे घाटघर ची दरी म्हणजेच कोकणकडा धुक्याच्या दुलइत सामावलेलं. आम्ही गेलो त्या दिवशी 21 ऑगस्ट ला इथे फारसा पाऊस नव्हता, पण ढगांच्या पुंजक्यांचा पाठशिवणीचा खेळ चालला होता. त्यात हि दरी मधेच दिसे तर क्षणात धुक्यात गडप होत असे. भूर भूर पाऊस सोबत वर नि धुक खूपच मजा येत होती खाली आल्यावर धरणाचा जलाशय आहे. ढगात लपलेला सूर्य आणि वाळलेली जलाशयातील झाडे, यांच्या मध्ये चंदेरी रंगाचे पाणी असे विलोभनीय दृश्य पाहून मन मोहून गेले . धुक्यात घाटावर आम्ही फिरलो,जवळच झाडीत मला हे झाड दिसले . घाटघर ला जाताना भंडारदरा धरणाचा विस्तृत जलाशय लागतो तोच हा. घाटघर घाट माथ्या बरोबरच आजूबाजूचा परिसरही नयनरम्य आहे.पिवळ्या सुंदर रानफुलांची मलमली शाल निसर्गात सगळीकडेच पाहायला मिळते. हे आहेत आसपासचे सह्याद्रीचे विलोभनीय कडे. टोकदार निरनिराळ्या आकारांचे हे कडे सर्वत्र पसरलेत. प्रत्येक कडा आपल्याला त्याच्याकडे खुणावतो हे मात्र नक्की

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा